नवी दिल्ली: भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation sindoor) राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांवर जोरदार हल्ला केला. भारतीय वायू दलाने दहशतवाद्यांच्या 9 तळावर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले आहेत. या कारवाईत 30 दहशतवादी मारले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारतासोबत युद्ध पुकारण्याच्या वल्गना करण्यात येत आहेत. दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानी (Pakistan) रेंजर्संकडून गोळीबारही केल्याची घटना घडली. तर, दहशतवाद्यांसोबत (Terrorist) आपला संबंध नसल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे रेंजर्स आज दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला दिसून आले.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयावर एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये, लष्कर ए तोएबाचे अनेक दहशतवादी ठार मारले गेले आहेत. त्यापैकी, एका दहशतवाद्याचा व्हिडिओ पाकिस्तानी माध्यमांनी शेअर केला आहे. त्यामध्ये, लष्कर ए तोएबाचा टॉप कमांडर आणि पाकिस्तानी सैन्य दलाचे अधिकारी दिसून येत आहेत. एकीकडे दहशतवाद्यांशी आपला कसलाही संबध नाही, असे म्हणणाऱ्या पाकिस्तानचं हे खरं रुप या व्हिडिओतून समोर आलं आहे.
भारतीय सैन्य दलाने पीओकेसह पंजाब प्रांतामधील मरीदके आणि बहावलपूर येथेही दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं. लष्कर-ए-तोयबा चा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ हा एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झाला होता. विशेष म्हणजे या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्य दलातील काही अधिकारी आणि पोलीसही सहभागी झाल्याचं व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पंजाब पोलिसचे आयजी अधिकारी देखील येथे उपस्थित होते. हाफिज अब्दुल रऊफने या अंत्यसंस्कार सोहळ्यात नमाज अदा केला. लष्कर ए तोएबाच्या टॉप कमांडरने अंत्यसंस्काराला जाणे आणि पाकिस्तानी सैन्य दलानेही उपस्थिती दर्शवणे हे पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेलं कनेक्शन जगजाहीर करत असल्याचे यावरुन दिसून येते. तरीही, पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवायांमध्ये आपला कसलाही हात नसल्याचे सांगितले जात आहे.
मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर एअर स्ट्राईकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा (14 members of Masood Azhar’s Family Killed) केलाय. यात हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला आहे. रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही यात समावेश आहे. तर अझहरचा भाऊ रौफ असगरच्या भावाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. यात आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.
हेही वाचा
Mock drill ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही मॉकड्रीलची मोहीम फत्ते, भरपावसात दिसलं देशप्रेम
अधिक पाहा..